पुण्याला पाठवलेले सहा रुग्ण कोरोनामुक्त

बीड

बीड : येथून पुणे येथे पाठवले ते सहा कोरणा रुग्ण बरे झाले आहेत. या सहा रुग्णांना यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड, जिल्हा पुणे येथून डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे हे सर्व रुग्ण नगर जिल्ह्यातील आपल्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
दरम्यान या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी अ‍ॅड.अजित देशमुख यांच्याशी संपर्क साधून आपण पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहोत, याची माहिती दिली. यातील एक रुग्ण वयस्कर होते. त्यांना पुणे येथे गेल्यानंतर तात्काळ आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले. त्यातून ते तीन दिवसात बाहेर निघाले आणि आता पूर्णपणे बरी झाले आहेत. या सर्व रुग्णांनी आपल्याला पुणे येथे जायला मिळाले आणि तेथे मिळालेले उपचारानंतर आमची सर्वांची मानसिकता आजारातून बरे होण्याची झाली असे सांगून नवीन जीवन जगण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आता सर्व परिवार नियमाप्रमाणे काही दिवसासाठी क्वारंटाईन केला असला तरी आपल्या गावी एकत्र राहत असून कोरोणा मुक्त झाला आहे. बीड जिल्ह्यातून पाठवलेले हे सहा रुग्ण ठणठणीत झाल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान या रुग्णांनी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आभार मानले आहेत. सर्व वातावरण शांत आणि पुरवत झाल्यानंतर हे कुटुंब अ‍ॅड.देशमुख यांच्या भेटीला येणार आहे.