बीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातून आज सर्वाधिक 188 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोघांचे स्वॅब पॉझिटीव्ह आले असून एक जण शहरातील तर दुसरा व्यक्ती परजिल्ह्यातील आहे.

पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये शहरातील अजीजपुरा येथील 17 वर्षीय मुलगा आहे. तर गिरवली ता.भूम जि.उस्मानाबाद येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. दरम्यान, 13 स्वॅब अनिर्णित आहेत.

प्रशासनाची सुधारित माहिती

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुधारित माहितीनुसार अजीजपुरा ऐवजी जुना बाजार, बीड येथे कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.

खा.शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात

बीड जिल्हा : पुन्हा चार जण पॉझिटीव्ह

रात्रीतून सरकार स्थापण्याचा निर्णय चुकलाच : देवेंद्र फडणवीस

कार्यारंभ ई-पेपर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Tagged