MURDER

कुऱ्हाडीने वार करत दोन भावंडांचा खून!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

 

बीड: जुन्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालत दोन भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील नागपूर (खु.) येथे सोमवारी (दि. १७) रात्री ११ वाजता घडली.
राम साळुंके (५०) व लक्ष्मण साळुंके (४७) अशी मयतांची नावे आहेत. १५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके याने दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती. तेंव्हा हा वाद आपसात मिटला होता; परंतु सोमवारी परमेश्वरने दोघांना फोनवरून शिवीगाळ केली. याबाबत त्याला समजवण्यासाठी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके गेले होते. यावेळी भररस्त्यात त्यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके, सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शव जिल्हा रुग्णालयात पाठविले. मंगळवारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. परमेश्वर साळुंकेविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे.

Tagged