पैठण पोलीस ठाण्याच्या ठाणेप्रभारी नियुक्तीवरुन गोंधळ

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

पैठण दि.5 : पैठण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाच्या नियुक्तीवरून पैठणमध्ये गोंधळ उडाला आहे. पोनि.भगिरथ देशमुख यांच्या बदलीनंतर एका पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दुसर्‍या पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक. उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केल्या आहेत. मात्र पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर पोलीस निरीक्षक किशोर सुंदरसिंग पवार यांची नेमणूक झाल्याचा आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. परंतु काही वेळातच पुन्हा पैठण पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक कैलास मुन्नालाल प्रजापती यांचा आदेश निघाला. यामुळे पोलीस दलामध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोण असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.