ACB TRAP

महावितरणच्या कनिष्ठ लिपीकासह एजंट एसीबीच्या जाळ्यात!

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

परळी दि.1 : वीजबिल भरणा नियमित केल्यानंतरही बिलावर थकबाकी दिसते, व्यावसायिक मिटरचा प्रकार असताना औद्योगिक वीजाकारणी होणे आदी तांत्रिक बाबी पुर्ण करून वीजबिलाचे दुरुस्तीचे वरिष्ठांकडून काम करुन देण्यासाठी तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. ती स्विकारतान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून परळी महावितरण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व एक खाजगी एजंटवर गुरुवारी (दि.1) कारवाई केली.

परळी शहरातील तक्रारदार वीज ग्राहक यांचे मिटरचा प्रकार हा इंडस्ट्रियल मिटरचा होता. व्यावसायिक वीज मिटरला आकारण्यात येणारे वीजबीलही ते नियमितपणे भरणा करीत होते. तरीही वीजबिलावर थकबाकी दाखवली जात होती. याबाबत वारंवार लेखी व तोंडी सांगुनही या ग्राहकाचा वीजबिलाचा गुंता सुटत नव्हता. वेळोवेळी या कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. वीजबील भरणा करुनही विनाकारण मनस्ताप सहन करण्याची वेळ आली होती. शेवटी कंटाळून या ग्राहकाने वीजवितरणचे कनिष्ठ लिपिक सचिन सुर्यवंशी यांच्याशी तडजोड केली. वीज बील दुरुस्ती प्रस्ताव वरिष्ठांकडुन मंजुरी घेऊन काम करुन देण्यासाठी लिपिक सुर्यवंशी यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार अर्ज दिला होता. सुर्यवंशी व खाजगी व्यक्ती शेख सगिर फकीर महमद यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ राहूल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक मारोती पंडित, उपअधीक्षक प्रशांत संपते उस्मानाबाद, उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, पोनि.अशोक हुलगे, पोलीस हवालदार शेख, पोलीस शिपाई बेळे, चालक करडे यांनी केली.

Tagged