खा. सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

पुण्यात दीपप्रज्वलन करताना घडली घटना

पुणे : येथील हिंजवडी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसचे उद्घाटन खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमातच सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. त्यांनी दीपप्रज्वलित केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना सुप्रिया सुळे यांच्या पुतळ्याजवळील दिव्याकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे हार घालत असताना या दिव्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच सुप्रिया सुळेंनी तातडीने ही आग विझवली. त्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही. या घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नाही. तसेच, घटनेनंतर पुढील कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या.