हस्ताक्षर बदल प्रकरणात आरोपी दोन शिक्षक, पण मास्टरमाईंड….

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या

बीड : बारावीच्या 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर बदल करणार्‍यांमध्ये केवळ दोनच शिक्षक नव्हे तर आणखी काही जणांचा समावेश असू शकतो असा अंदाज बोर्डातील समितीने वर्तवला आहे. त्या दिशेने आता पोलीस कारवाईत तपास सुरु असून, तब्बल 27 दिवस त्या दोन शिक्षकांच्या ताब्यात उत्तरपत्रिका जमा कारायला सांगितल्यावरही होत्या, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. याशिवाय, अक्षरबदल प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा निकाल घोषित केला जाणार आहे.
      माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी -मार्च महिन्यात घेण्यात आल्या. या परीक्षेदरम्यान उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात सुरु होते. केंद्रप्रमुख, कस्टोडियन, मॉडरेटर, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य ते शिक्षक अशा प्रक्रियेतून बोर्डात असे उत्तरपत्रिका तपासणीनंतर पोहचविण्यात येतात. यंदा या परीक्षेसाठी 1 लाख 75 हजारहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. बीड, अंबाजोगाई, कान्होळा, पैठण या ठिकाणच्या फिजिक्स विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आल्या असता. घनवट, आणि पिंपळा येथील अध्यापक राहुल भंगवान ऊसारे आणि मनिषा भागवत शिंदे यांनी 13 मार्च रोजी उत्तरपत्रिका तपासून जमा करणे अपेक्षित असतांना वारंवार बोर्डाने सांगून देखील 8 एप्रिल रोजी जमा केल्या. मॉडरेटरच्या हे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांची सुनावणी झाल्यावर समितीच्या समोर सर्व प्रकार आला. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकार्‍यांनी विभागीय शिक्षण मंडळाच्या सांगण्यानुसार त्या दोन्ही शिक्षकांवर आक्षेपार्ह लेखन प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात केवळ दोनच जण नव्हे तर आणखी इतर काही जाणांचा समावेश असू शकतो असा अंदाज आता समितीच्यावतीने वर्तण्यात आला आहे. त्या दृष्टीकोनातून देखील तपासणी केली जात असल्याचे बोर्डातील अधिकार्‍यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

एकूण 612 गैरप्रकारांचा अहवाल
विभागीय शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या परीक्षेवेळी 111; तर परीक्षेनंतर 501 गैरप्रकार आढळले. चौकशीनंतर 396 विद्यार्थ्यांना निर्दोष मुक्त करून त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह मजकूर लिहिणे, पान फाडणे, पेन, शाही बदल प्रकणातील 109 विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यात आली. दोन विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द करण्यात आली आहे, तर एका विद्यार्थ्यांवर (परीक्षा दालनातून उत्तरपत्रिका बाहेर घेऊन जाणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित 103 विद्यार्थ्यांची गैरप्रकाराबद्दल चौकशी केली जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा निकाल घोषित केला जाणार आहे.

Tagged