Sirsala दि.27 : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये घेवून ये म्हणत विवाहितेचा छळ केला. या प्रकरणी सिरसाळा (sirsala police station) पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (He harassed the married woman by taking four lakh rupees from Maher to buy a tractor)
ज्योती भिमा मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सासरचे घरातील मंडळींनी संगनमत करुन माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी चार लाख रूपये घेवून ये असे म्हणून उपाशी पोटी ठेवत सतत शारिरिक आणि माणसिक छळ केला. अत्याचार करत मारहाण, शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सासरा काशीनाथ तुळशीराम मुंडे, सासू निलाबाई काशीनाथ मुंडे, पती भिमा काशीनाथ मुंडे, दिर ज्ञानोबा काशीनाथ मुंडे, जाऊ ज्योती ज्ञानोबा मुंडे, स्वाती अर्जुन मुंडे यांच्यावर सिरसाळा पोलीस ठाण्यात कलम 498 (अ), 323, 504,506, 34 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह.तुषार गायकवाड करत आहेत.