बीड जिल्हा : आज सकाळी पुन्हा 7 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचे मीटर सुरुच असून रुग्ण संख्या 500 पार गेली आहे. आज मध्यरात्री 1 वाजता 37 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले होते. त्यात दुपारी 12 वाजता पुन्हा 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आजच्या दिवसात एकूण 44 रुग्णांची नोंद झाली आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या 512 इतकी झाली आहे.

  आज पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये, बीड शहरातील कबाड गल्ली येथील 39 वर्षीय महिला, सुर्या लॉन्सजवळील 52 वर्षीय पुरुष, रहमतनगर येथील 40 वर्षीय पुरुष, आदित्य नगर (व्यंकटेश शाळेजवळील) 30 वर्षीय महिला, धानोरा रोडवरील 32 वर्षीय महिला, कॅनरा बँक कॉलनी धानोरा रोडवरील 65 वर्षीय पुरुष तर अंबाजोगाई येथील केशवनगर येथील 55 वर्षीय पुुरुषाचा आज पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये समावेश आहे.

दुपारी आलेला खालील अहवाल पहा.

रात्री आलेला खालील अहवाल पहा

Tagged