उभ्या ट्रकवर ट्रक आदळला; एक ठार

क्राईम बीडबीड : पम्चर असलेल्या उभ्या ट्रकवर भरधाव आलेला ट्रक आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी आहे. बीड बायपासवर बुधवारी (दि.1) पहाटेच्या सुमारास घडली.


औरंगाबादला फरशी घेऊन ट्रक (केए.56-4471) जात होता. राष्ट्रीय महामार्ग बीड बायपासवर दुसरा एक ट्रक (टीएस-07, यूइ-1107) पम्चर झाल्याने रोडवरच उभा होता. फडशी घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला अंधारात उभा असलेला ट्रक न दिसल्यामुळे पाठीमागून जोरात आदळला. यामध्ये ट्रकमधील फरशी समोर आल्याने मध्ये दाबून क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. तर चालक ट्रकमध्ये अडकून पडला होता. क्रेनच्या साहाय्याने मोठ्या प्रयत्नाने त्यास सुखरूप बाहेर काढत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीणचे सपोनि. सुजित बडे, पोउपनि.पवन राजपूत, प्रल्हाद चव्हाण, म्हस्के, लखन जयभाये, महामार्ग पोलीस पोउपनि.गित्ते, सुरवसे आदी घटनास्थळी दाखल होते.