corona-swab

बीड जिल्हा : सोमवारी पुन्हा चार पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे परळी


बीड, दि.13 : बीड जिल्ह्यात सोमवारी सकाळी पुन्हा चारजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवसातील प्रलंबीत अहवालापैकी 305 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील एक अनिर्णित आहे. तर 300 निगेटिव्ह आहेत. अजुनही 128 अहवाल प्रलंबीत असल्याचे प्रशासनाने सांगितले.


आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये परळीच्या एसबीआय बँकेचे 2 ग्राहक आहेत ते तालुक्यातील नंदागौळ येथील 40 वर्षीय पुरुष व शहरातील पेठ मोहल्ला भागातील 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच शहरातील सिध्दार्थ नगर येथे 30 वर्षीय महिला व 15 वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे पुर्वीच्या पॉझिटिव्हच्या संपर्कातील असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Tagged