चिमुकलीला वाचवण्यासाठी गेलेल्या बापासह चुलत्याचा करंट लागून मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड शहरातील घटना

बीड : लोखंडी सीडीमध्ये विद्यूत प्रवाह उतरल्याने एक सात वर्षीय चिमुकलीला करंट बसला. तिला वाचवण्यसाठी गेलेल्या बापासह चुलत्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बीड शहरातील गोविंदनगर भागात सोमवारी (दि.13) घडली.

श्रेया वडमारे तुळशीराम वडमारे (वय 7), तुळशीराम बापुजी वडमारे, बाळू उर्फ रमेश बापूजी वडमारे अशी मयतांची नावे आहेत. श्रेया ही लोखंडी सीडीवर जात होती. या सीडीमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने तिला करंट बसला. हे निदर्शनास येताच बाजुला असलेले वडील तुळशीराम व चुलते रमेश यांनी तिला वाचवण्यासाठी तिच्याकडे धाव घेतली. यावेळी तिघेही चिटकून बसले, यामध्ये तिघांच मृत्यु झाला. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे वडमारे परिवारात दुःखाचा डोंगर पसरला आहे. घटनास्थळी महावितरणे कर्मचारी यांनी धाव घेत विद्युत पुरवठा बंद केला.

Tagged