चोर समजून जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

आष्टी न्यूज ऑफ द डे पाटोदा

आष्टी : तालुक्यातील फत्तेवडगाव येथे पहाटे फिरणार्‍या व्यक्तीला जमावाने एकत्र येऊन बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना (दि.13) पहाटे घडली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अलीम उर्फ विशाल नारायण भोसले (वय 35, रा.पुंडी वाहिरा, ता.आष्टी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फत्तेवडगाव गावात पहाटे चोरीच्या उद्देशाने तीन-चार जण आले होते. त्यापैकी एक जण जमावाच्या हाती लागल्याने त्याला जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्याला उपचारासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी जाहीर केले. या घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक माधव सुर्यवंशी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती घेण्यासाठी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे हेही घटनास्थळी पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.