अजित कुंभार यांची मुंबईला बदली; अजित पवार बीडचे नवे सीईओ

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची मुंंबई महानगर पालिकेच्या सहआयुक्त पदी बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागी पुणे येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाने 8 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या शुक्रवारी केल्या आहेत. यामध्ये कुंभार यांचा देखील समावेश आहे. बीड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून येते असलेले अजित पवार हे पुणे येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी (जात पडताळणी) हे म्हणून कार्यरत होते. दरम्यान, कुंभार यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून छाप पाडली होती. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळेच जिल्ह्यातील नरेगा घोटाळा प्रकरणात कारवाईस गती मिळाली.

Tagged