पत्नीवर शिवाजीनगर पोलीसात 353 चा गुन्हा
बीड दि.7 : न्यायालयाच्या आवारामध्ये पोलीस पत्नीने ड्युटीवर असलेल्या पोलीस पतीला मारहाण केली. या प्रकरणी शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पत्नीवरच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.7) सकाळी न्यायालयाच्या आवारात घडला.
सद्दाम सत्तार शेख (वय 30) हे पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांची पत्नी मर्जीना सद्दाम शेख या आष्टी पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. दोघांमध्ये कौटूंबिक वाद सुरु आहे. गुरुवारी मर्जीना या न्यायालयात होत्या. यावेळी न्यायालयात शासकिय कामानिमित्त आल्यानंतर मर्जीना यांनी शिवीगाळ करत चापटाने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी मर्जीना शेख यांच्यावर कलम 353, 332, 341, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिना तुपे करत आहेत.