accident

अज्ञात वाहनाच्या धडकेत भोळसर युवकाचा मृत्यू

क्राईम माजलगाव

माजलगाव :  अज्ञात वाहनाच्या धडकेत टाकरवण येथील 30 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.11) पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 222 तालखेड फाट्यावर घडली आहे.

याबाबतीत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संतोष गिरमाजी पट्टेकर (वय 30) हा टाकरवन येथील भोळसर युवक आहे. तो गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथे पाई आजोळी जात होता. सदरील परिसरात मुसळधार पाऊस पडत होता.यावेळी या भोळसर व्यक्तीने अंगावरील सर्व कपडे काढून टाकून नग्न अवस्थेत तो पायी चालत जात होता. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग 222 वरील तालखेड फाट्यावर अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. या धडकेत तो जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे 5 च्या दरम्यान घडली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. अज्ञात वाहना विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. पवार, खराडे हे करत आहे.

Tagged