mansoon

बीड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

बीड शेती
वार्षिक सरासरीच्या तुलनेत 10.52 टक्के
बीड ः जिल्ह्यात यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 10.52 टक्के नोंद झाली आहे.

  जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हजेरी लावली आहे. वडवणी तालुक्यात सर्वाधिक तर सर्वात कमी आष्टी तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. पावसाने अनेक भागात शेतीचे नुकसान झाले आहे. शेती वाहून गेली आहे, तसेच झाडांचेही नुकसान झाले. काही तालुक्यात तर छोटे-मोठे बंधारे तुडुंब भरले आहेत. तलावात देखील पाणी पातळी वाढली आहे. दरम्यान, बहुतांश भागात समाधानकारक असा पाऊस होत आहे.
आतापर्यंत तालुकानिहाय पावसाची मि.मी.मध्ये नोंद
बीड            559
पाटोदा        294
आष्टी        513
गेवराई        432
शिरुर        139
वडवणी         219
अंबाजोगाई        332
माजलगाव        656
केज            354
धारुर        138
परळी        281
धारूर
धारुर : तालुक्यात बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासूनच पावसात सुरुवात झाली होती. मध्यरात्रीपर्यंत पावसाचा वेग वाढतच गेला रात्रभर पडलेला पाऊस आणि गुरुवारी सकाळी ही पावसाची रिपरिप कायम सुरू असल्याने तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे झालेला पाऊस हा पेरणीयोग्य असल्याने शेतकरी आता पेरणीच्या कामास सुरूवात करणार आहेत.
पाटोदा
पाटोदा : तालुक्यात रात्री नऊपासून पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर चांगला पाऊस झाला. छोटे-छोटे तलाव या पावसाने भरण्याची शक्यता आहे. तालुक्यातील अनपटवाडी, गारमाथा, नायगाव, कुसळंब, पिंपळवंडी, पांढरवाडीफाटा, सुप्पा, पाटोदा, पाचेगाव, पाचंग्री, जाटनांदुर, महासांगवी, डोंगरकिन्ही, कारेगाव निळवंडे, डोमरी वडझरी करंजवण, सौदाना, सोनैगाव वहाली, पांगरी आदी परिसरात जोरदार पाऊस पडला. 
शिरुर
शिरूर कासार : तालुक्यातील देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. येथील सिद्धेश्वर बंधारा भरला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची लगबग सुरु झाली आहे.

Tagged