बीड दि.1 : तालुक्यातील चऱ्हाटा फाटा येथे दगडाने ठेचून तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.1) सकाळी उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
पांडुरंग नारायण माने (रा.आनंदवाडी ता.बीड) असे मयताचे नाव आहे. दगडाने ठेचून पांडुरंग यांचा खून करण्यात आला असल्याची माहिती आहे. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश शेजूळ, सुनील अलगट आदींनी धाव घेतली आहेत. पंचनामा सुरू असून मृतदेह शविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.