marhan, hanamari,

बायको नीट बोलत नाही, म्हणून जावयाची सासूला बेदम मारहाण

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बीड दि.14 ः तुझी मुलगी मला नीट बोलत नाही, आता मी तिला नांदवणार नाही, असे म्हणत जावयाने सासुलाच बेदम मारहाण केली. ही घटना बर्दापूर शिवारातील पाचपीर दर्गा शिवारात घडली. या प्रकरणी जावयासह इतरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमल बाबू मस्के (रा.साठेनगर ता.परळी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे जावाई मनोज विठ्ठल गव्हाणे यांनी तुझी मुलगी माझ्याशी नीट वागत नाही, मी तिला नांदवणार नाही. असे म्हणून आईच्या मदतीने कांदा कापायच्या विळीने गळ्याला मारुन जखमी केले. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात मनोज विठ्ठल गव्हाणे, लताबाई विठ्ठल गव्हाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.चेवले करत आहेत.

Tagged