30 लाखांचे सोने घेऊन बंगाली कारागीर फरार, माजलगावात खळबळ

क्राईम न्यूज ऑफ द डे माजलगाव

प्रतिनिधी । माजलगाव
दि.14 : शहरातील शहरातील पाच सराफा व्यापार्‍यांनी दागिन्यांची डिझाईन बनवायला दिलेले सोने बंगाली कारागीराने परत न करता फरार झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. याबाबत सराफ व्यापार्‍यांनीच सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अद्यापही याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही.

माजलगाव शहरात जवळपास दीडशे सराफा व्यापारी दुकान आहेत. यातील बहुतांश व्यापारी हे ग्राहकांनी दिलेली डिझाईन बनवण्यासाठी बंगाली कारागिरांना जागा दिलेली आहे. या ठिकाणी सर्व व्यापारी सोने देऊन त्यांच्याकडून विविध डिझाईनमध्ये दागिने तयार करून देतात. अशाच प्रकारे शहरातील पाच व्यापार्‍यांनी डिझाईन बनवण्यासाठी दिलेले सोने घेऊन हे बंगाली कारागीर शनिवारी रात्री शहरातून फरार झाले असल्याची पोस्ट सराफा असोसिएशनचे रामराजे रांजवण यांनी फेसबूकवर टाकली होती.

या बंगाली कारागिराने पाच व्यापार्‍यांचे जवळपास लाखो रुपयाचे सोने घेऊन फरार झाले आहेत. कारागिराने सोबत एक दुचाकी (एम.एच.20 इ एक्स 3134) नेल्याचे देखील या सराफा व्यापार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. या सोन्याची किंमत जवळपास 30 लाख रुपये व मोटरसायकलची किंमत 90 हजार रुपये असल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.
याबाबत हे व्यापारी रविवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी या सोन्याच्या पावत्या मागितल्याने हे सराफ व्यापारी परत पोलीस ठाण्याकडे फिरकलेच नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Tagged