vidhan parishad

बीडसह 4 जिल्ह्यांतील भुसंपादन घोटाळा विधीमंडळामध्ये गाजणार

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मागविली माहिती; घोटाळेबाज अधिकार्‍यांचे धाबे दणाणले

बीड : बीडसह चार जिल्ह्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात 70 ते 75 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. हा घोटाळा आता विधीमंडळामध्ये गाजणार आहे. घोटाळ्याबाबत आवाज उठविण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माहिती मागविली असल्याने घोटाळाबाज अधिकार्‍यांचे आता धाबे दणाणले आहेत.

  भुसंपादन घोटाळा प्रकरणात शामराव सुंदरराव खरात हे मुळ तक्रारदार आहेत. त्यांनी तक्रारीत मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.211 साठी हायवेपासून दूरच्या जमिनी हायवेवर दाखवून भूसंपादन केले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या जिल्ह्यांतील 167 एकर जमिनीसाठी 116 कोटी 67 लाख रुपयांचा मावेजा संबंधितांना देण्यात आला. जमिनीचे योग्य मुल्यमापन करुन मावेजा वाटप न केल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सुमारे 70 ते 75 कोटी रुपयांपेक्षा जास्त भुदंड सहन करावा लागला. यात शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. या घोटाळच्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यातील गाव निहाय वाटप केलेल्या मावेजाचा तपशील मागविला आहे. तसेच, घोटाळेबाज अधिकार्‍यांवर काय कारवाई केली? यासह संपादीत केलेल्या जमिनीचा गट नंबर निहाय नकाशाची प्रत मागविण्यात आली आहे. सदरील माहिती संबंधितांना तत्काळ सात दिवसांच्या आत उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश औरंगाबादच्या पुनर्वसन उपायुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार बीडचे समन्वयचे उपजिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी बीडच्या उपविभागीय अधिकार्‍यांसह जायकवाडी प्रकल्पच्या उपजिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले आहेत.

Tagged