MURDER

धारदार शस्त्राने तरुणाचा खून

आष्टी क्राईम न्यूज ऑफ द डे

अज्ञातावर खूनाचा गुन्हा दाखल
आष्टी :  तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रामदास पांडुरंग चव्हाण (वय 35 रा.पिंपळखेड ता.आष्टी जि.बीड) असे मयताचे नाव आहे. पिंपळखेड येथील त्यांच्या शेतात गोठ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. मयताच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. या प्रकरणी आंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tagged