collector jagtap

कोरोना रूग्णसंख्या वाढताच जिल्ह्यात कडक निर्बंध लागू

न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकार्‍यांचे नवे आदेश
बीड : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना रूग्णसंख्या वाढताच जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. सभा, मेळाव्यांना मनाईसह खासगी क्लासेसवरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, 5 किंवा 5 पेक्षा जास्त रूग्ण आढळताच कंटेन्मेंट झोन लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जगताप यांनी दिले असून 31 मार्च 2021 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू करीत आहे.
या केल्या आहेत उपाययोजना
जिल्ह्याातील घर अलगीकरण करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारावेत.
सदर व्यक्ती घर अलगीकरण कालावधीत बाहेर आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करून त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण करावे.
सार्वजनिक स्वरूपाचे संमेलने, मेळावे प्रतिबंधीत राहतील. जिल्ह्यातील
सर्व खाजगी कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत पूर्णतः बंद राहतील (10 वी व 12 चा वर्ग वगळून)
सर्व यात्रा, आठवडी बाजार हे दिनांक 31.03.2021 पर्यंत पूर्णतः बंद राहतील.
हात गाडीवरील भाजी, फळ, वस्तु विक्रेते यांना सोशल डिस्टन्सीग, मास्कचा वापर करून भाजी, फळ, वस्तु विकण्यास परवानगी राहील.
सर्व प्रकारचे राजकीय कार्यक्रम, मोर्चे, निदर्शने, आंदोलन, उपोषणास मनाई
5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास 31 मार्चच्या मध्यरात्री पर्यंत मनाई
कोविड-19 संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनाधिकृत माहीती इलेक्ट्रॉनिक्स किंवा सोशल मिडीया इत्यादींच्या माध्यमातून पसरविण्यात येऊ नये. असे आढळल्यास संबंधिताविरुद्द फौजदारी कारवाई करण्यात येईल.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या ठिकाणच्या 100 मीटर परिसरात 5 किंवा 5 पेक्षा जास्त कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येतील असा परिसर तत्काळ कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जगताप यांनी दिले आहेत.

Tagged