lachkhor police

गांजा बाळगणारा पडकला, पण अनेकांच्या संसाराची ‘राख’रांगोळी करणारा निसटला!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

पाटोदा पोलिसांची कारवाई संशयास्पद

पाटोदा : शहरातील अनिकेत बियर बारजवळील एका पत्र्याच्या शेडमधून जवळपास ६४ हजार १०० रुपयांचा ६ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु सर्वसामान्यांच्या संसाराची ‘राख’रांगोळी करणारा मुख्य सूत्रधार मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकला नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राहूल पोपट जावळे (वय २३, रा. भीमनगर, पाटोदा) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील अनिकेत बिअर बारजवळील एका पत्र्याच्या शेडमधून गांज्याची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत शेडमधून ६ किलो गांजा जप्त करत गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी एका राजकीय कार्यकर्त्याची बराचवेळ चौकशी केल्याची देखील माहिती आहे. गांजा विक्रीतून कार्यकर्त्याने गोरगरीबांच्या संसाराची ‘राख’रांगोळी केली आहे. त्याची चौकशी पोलिसांनी केल्यानंतर पोलिसांवर दबाव असल्याने त्याला सोडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांशी संपर्क न झाल्याने त्यांचे म्हणणे समजू शकले नाही.

Tagged