सुनील जायभाये यांना सक्तीच्या रजेवर
पाठवल्यानंतर ठिय्या आंदोलन तूर्त मागे
अंबाजोगाई दि.11 : डीवायएसपी सुनील जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी आबासाहेब पांडे या दूतामार्फत पाठवलेल्या संदेशावर आंदोलन कर्त्यांनी विचार विनिमय केला. व जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, मात्र ते पुन्हा अंबाजोगाईमध्ये आल्यास ना.धनंजय मुंडे व आ.संजय दौंड यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करु असा इशारा दिला. रविवारी (दि.11) रात्री हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.
विनयभंग आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले डॉ.सुहास यादव यांचा शोध घेताना चौकशी करण्यासाठी म्हणून स्वतः डीवायएसपी सुनील जायभाये यांनी मंगळवारी 6 जुलै रोजी रात्री त्यांचे चुलत भाऊ विलास यादव यांना प्रशांतनगर भागात गाठले. तिथे जायभाये यांनी विलास यादव यांना अर्वाच्च भाषेत जातीवरून शिवीगाळ करत मारहाण केली, कुटुंबाबाबतही आक्षेपार्ह्य भाषा वापरली असे क्रांती मोर्चाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यानंतर यादव यांना पोलीस ठाण्यात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचा काही कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर यादव यांची सुटका करण्यात आली. या घटनेचे पडसाद बुधवार पासून उमटण्यास सुरूवात झाली. विलास यादव यांना चौकशीच्या नावाखाली बेदम मारहाण व जातीवाचक अर्वाच्च शिवीगाळ करणारे डीवायएसपी जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. ते सलग पाचव्या दिवशी रवीवारीही सुरूच होते. या पाच दिवसात आंदोलन कर्त्याला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्याच्या कानाकोपर्यातुन व बाहेरून अनेक मान्यवर व शेकडो नागरीक अंबाजोगाईमध्ये आले. आंदोलन कर्त्या सोबत चर्चा करण्यासाठी आयजी प्रसन्ना अंबाजोगाईत आले. चर्चा झाल्या नंतर त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना या प्रकरणाची निपक्षः पाती पणे चौकशी करून आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या आदेशा नंतरही काल पाचव्या दिवशी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच होते. त्या मुळे डीवायएसपी सुनील जायभाय यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी आबासाहेब पांडे या दूता मार्फत सायंकाळी प्रस्ताव पाठवला. या वेळी आंदोलन कर्त्यासोबत चर्चा करण्यासाठी आ.संजय दौंड, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, दत्ता पाटील, बबन लोमटे यांच्यासह अनेक मान्यवर होते. या वेळी पालकमंत्री महोदयांनी पाठवलेल्या संदेशावर अॅड.संतोष लोमटे, वैजनाथ देशमुख, प्रशांत अदनाक, देशमुख या आंदोलन कर्त्यांनी विचार विनिमय करून सर्व आंदोलन कर्त्याच्या वतीने अॅड.माधव जाधव यांनी सुनील जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, या दरम्यान त्यांची बदली, निलंबन करा मात्र ते पुन्हा अंबाजोगाई मध्ये आले नाही पाहिजेत. असा इशारा देत जर करता ते तर पुन्हा अंबाजोगाईमध्ये आले तर आम्ही ना.धनंजय मुंडे व आ.संजय दौंड यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करू असा इशारा त्यांनी दिला. रविवारी रात्री हे आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले.
घाटनांदूर येथे डीवायएसपी
जायभायेंच्या पुतळ्याचे दहन
घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मराठा समाजाविषयी जातीयवादी गरळ ओकणार्या डीवायएसपी जायभाये यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने दहन करण्यात आला. जोपर्यंत जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. तसेच त्यांची बदली होणार नाही. तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चा आंदोलन मागे घेणार नाही, असे मत मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांकडून व्यक्त करण्यात आले. प्रशासनाने लवकरात लवकर जातीयवादी जायभायेवर कार्यवाही करावी अन्यथा याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील. याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन आणि शासन असेल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.