धारूर कृ.उ.बा. समितीच्या सभापतीपदी सुनील शिनगारे

धारूर न्यूज ऑफ द डे

धारूर : येथील बाजार समिती सभापती पदाची बहुचर्चित निवड प्रक्रिया सोमवारी पार पडली. अटीतटीच्या लढतीत भाजपकडून महादेव तोंडे, उपसभापती असलेले सुनील शिनगारे यांनी अर्ज दाखल केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत लगड यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपकडून दाखल करण्यात आलेल्या दोन अर्जुन महादेव तोंडे यांनी माघार घेतल्याने सुनील शिनगारे यांचा सभापती पदाचा मार्ग मोकळा झाला. सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आंबासाखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर, भाजप नेते राजाभाऊ मुंडे हे बाजार समितीमध्ये उपस्थित होते.

महादेव बडे यांच्या निधनाने येथील बाजार समिती सभापती पद रिक्त झाले होते. या सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. भाजपकडून महादेव तोंडे तसेच उपसभापती असणाऱ्या सुनील शिनगारे यांनी अर्ज दाखल केले होते. तर राष्ट्रवादीकडून चंद्रकांत लगड यांनी अर्ज दाखल केला होता. अटीतटीच्या झालेल्या या सभापतीपदाच्या निवडप्रक्रियेत गुप्त मतदान करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7 तर भाजपला 10 मतदान करण्यात आले. मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीने पार पाडण्यात आली. भाजपकडून दाखल करण्यात आलेल्या दोन अर्जापैकी महादेव तोंडे यांनी आपला अर्ज ऐनवेळी मागे घेतला, त्याचवेळी सभापती पदी सुनील शिनगारे यांची निवड होणार हे निश्चित झाले होते. पीठासीन अधिकारी म्हणून श्री.मोठे धारूरचे सहाय्यक निबंधक कार्यालयाचे शिवराज नेहरकर यांनी कामकाज पाहिले. सभापती सुनील शिनगारे यांच्या निवडीचे आंबासाखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे यांनी स्वागत केले.

Tagged