corona

बीड जिल्हा : आज कोरोनाचे पावणे दोनशे रुग्ण

बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी (दि.१३) कोरोनाचा आकडा पावणे दोनशेच्या घरात गेला आहे. कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

जिल्ह्यात सोमवारी ४०८१ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.११) प्राप्त झाले, त्यामध्ये १७५ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३९०६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ४६, अंबाजोगाई २, आष्टी २८, धारूर ३, गेवराई ३६, केज १२, माजलगाव ६, परळी १, पाटोदा २०, शिरूर १५, वडवणी ६ असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोरोनाचा आकडा वाढत असल्याने वेळीच कोरोना नियमांचे पालन करून प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Tagged