pankaja munde and narendra modi

माझा नेता मोदी, शहा आणि नड्डा -पंकजाताई मुंडे

देश विदेश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

बीड, दि. 13 : नाराज कार्यकर्त्यांसमोर आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी वरळी येथे आपली भुमिका जाहीर केली. माझा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आहेत, असे पंकजा मुंडेंनी आज स्पष्ट केले. त्यामुळे आता येणार्‍या काळात पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंडे गटात कटशाहचे राजकारण पहायला मिळणार आहे.

कार्यकर्त्यांसमोर बोलताना पंकजाताई म्हणाल्या, माझा आतापर्यंतचा प्रवास खडतर होता, पुढेही खडतरच दिसतोय; पण अविचाराने निर्णय घ्यायचे नसतात. मला अनेकजण हे करा ते करा असे सांगत असतात. पण हा पक्ष म्हणजे माझं घर आहे. कोणी आपल्याच घरातून बाहेर जात असतं का? घराचं छत जेव्हां अंगावर पडेल तेव्हा बघू. सध्या मला हे धर्मयुध्द टाळायचं आहे या धर्मयुध्दात आपले सैनिक धारातिर्थी पडतात. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय घ्यायचा असतो. माझा परिवार केवळ प्रीतम मुंडे किंवा अमित नाहीत. तर हा संपूर्ण समाज माझा परिवार आहे. माझं भांडण नियतीशी आहे. कुठल्याही व्यक्तीशी अथवा पदाशी माझं भांडण नाही. दबावतंत्र वापरून कुठलं मंत्रिपद मिळवायचं हे संस्कार मुंडे साहेबांचे नाहीत. लोकांची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. तुमची सगळ्यांची नाराजी मला समजू शकते. माझ्या डोळ्यात पाणी आले म्हणून तुम्ही राजीनामे दिले. पण तुमच्या डोळ्यात पाणी आले तर मी जगू शकत नाही. पक्षानं दिलेलं मी लक्षात ठेवते परंतु न दिलेलं कार्यकर्ते लक्षात ठेवतात. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मी बोलत असून आज मी तुमचे राजीनामे नामंजूर करीत आहेत. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होऊन मला राजकारण करायचे नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

  • मी हरले. मला संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मी संपणार नाही. कारण तुम्ही आहेत. मला सत्तेची लालसा नाही, कुठलंही अपेक्षा नाही. तुमच्या प्रेमाच्या ऋणात मी आहे. जनतेची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. कुठलंही पदी मिळण्यासाठी मी राजकारणात आलेली नाही.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सन्मानपुर्वक वागणूक दिली. त्यांनी मला कधीही झापलेलं नाही. मी कुणाचा फटकार खाऊन तुमच्यासमोर येईल का? पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी देखील माझी भेट झाली. त्यांनी देखील तुम्ही कार्यकर्त्यांना शांत कराल, असा विश्वास असल्याचे पंकजाताई म्हणाल्या.
  • भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी माझ्या समाजाच्या मंत्र्यांला अपमानित का करु? लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात आहे, असं त्या म्हणाल्या. निवडणुकीत अनेक लोक पराभूत झाले. कराड यांचं वय 65 आहे. ते आपल्या समाजाचे आहेत मी त्यांचा अपमान करणार नाही, असं त्या म्हणाल्या.
  • मुंडे साहेब गेले त्यावेळी माझ्याकडे शून्य ताकद होती. पायाखालची जमीन सरकलेली असताना त्यावेळी केंद्रात मला मंत्रीपदाची ऑफर होती पण मी ती नाकारली पंकजा मुंडे तुम्हाला राजीनामा द्यायला लावेल का? मला दबावतंत्र वापरायचं नाही, असं सांगत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे नाकारत असल्याची घोषणा केली.
  • गोपीनाथ मुंडे यांनी ऊसाच्या फडातून आणून माणसं जोडली. कुणाला सभापती बनवलं तर कुणाला मार्केट समितीचा चेअरमन केलं. हे असंच जाऊ द्यायचं का सगळं?, असा सवाल करतानाच इथून पुढे असा प्रयोग करू नका. तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. पद मिळवणं हे मुख्य ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करणं आहे. मला जेव्हा वाटेल इथं राम नाही. तेव्हा बघू. पण आता आपण आपलं घर सोडायचं नाही. हा माझा निर्णय तुम्ही मान्य कराल ही अपेक्षा आहे, असं पंकजा म्हणाल्या.
  • धर्मयुद्धात पाच पांडव जिंकले. त्यांनी फक्त सात गावं मागितली होती. पण सुईच्या टोकाएवढीही जागा देणार नसल्याचं कौरव म्हणाले. त्यानंतरही पांडव जिंकले. या धर्मयुद्धात पांडव का जिंकले? कारण त्यांच्याकडे कृष्णाचं सारथ्य होतं. त्यांच्याविरोधात जे लढत होते, त्यांच्या मनातही पांडवांच्या मनात प्रेम होतं. म्हणून पांडव जिंकले. काळ कधीच कुणासाठी थांबत नाही. मी दु:खी नाही. मला काही मिळालं नाही या चिल्लर गोष्टींवर मी जात नाही. मीही पांडव आहे. आम्हीही योद्धे आहोत. मीही धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे, असं त्या म्हणाल्या.
Tagged