corona vaccine

18 वर्षांवरील सर्वांना मिळणार लस

न्यूज ऑफ द डे बीड

नवी दिल्ली : लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून महाराष्ट्र दिनापासून (दि.1 मे) लसीकरण 18 वर्षावरील सर्वांना खुलं होणार आहे. लस उत्पादक कंपनीकडून राज्यांना थेट पुरवठाही होऊ शकणार असून लस निर्धारित किंमतीत खुल्या बाजारात ही विकत घेता येणार असल्याचा निर्णय झाला आहे.

देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होत आहे. पार्श्वभूमीवर देशात 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार केंद्र सरकारने निर्णय घेतला असून लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याला वेग येणार आहे.

Tagged