gold

40 दिवसामध्ये सोनं दुप्पट करण्याचे अमिष!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

वृद्ध महिलेला गंडविले ; सव्वा तीन लाखांची फसवणूक
बीड
दि.22 : चाळीस दिवसामध्ये डब्बल सोने करुन देण्याचे अमिष दाखवून शहरातील एका वृद्ध महिलेला तब्बल सव्वा तीन लाखांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रइसोनिसा बेगम शेख अहमद (वय 70 रा.इस्लामपूरा बाबा चौक, बीड) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेख नाजीया शेख आरेफ (रा.जामा मस्जिद, मोमीनपुरा बीड) हिने चाळीस दिवसामध्ये डब्बल सोने करण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर साडे पाच तोळे सोने, एक तोळ्याच्या चांदीच्या अंगठ्या अशी 2 लाख 75 हजारांची दागिणे व नगदी 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर चाळीस दिवसानंतरही फियादीचे पैसे व दागिणे परत दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रइसोनिसा बेगम यांनी पेठ बीड पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोह.शिंदे करत आहेत.

Tagged