शेजार्‍यांशी युद्धात भारताला मित्र देणार ब्रह्मास्त्र

देश विदेश न्यूज ऑफ द डे

भारत रशियाकडे एस-400 क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा लवकर देण्याची मागणी करणार

दिल्लीः लडाख सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे भारत आणि चीनचे संबंध विकोपाला गेले आहेत. भारतानं सीमावर्ती भागात फौजफाटा वाढवला आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. आता चीनला चोख उत्तर देता यावे म्हणून, राजनाथ सिंह आजपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौर्‍यावर आहेत. 2018 मध्ये एस-400 साठी भारतात आणि रशियात 5 अब्ज डॉलरचा करार झाला होता.

चीनसोबत निर्माण झालेला संघर्ष पाहता ही यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्याच्या दृष्टीनं भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. भारताला ही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा 2021 मध्ये मिळणार होती.रशिया भारतासोबतच आणखी काही देशांना ही यंत्रणा देणार आहे. मात्र त्यांच्या आधी ही यंत्रणाआपल्याला मिळावी, असा भारताचा प्रयत्न आहे.

दोन्ही देशांमधील संबंधांचा संदर्भ देऊन एस-400 यंत्रणा लवकर सोपवण्याची मागणी करण्यात येणार आहे. सुखोई, मिगच्या विमानांचे सुट्टे भाग मिळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पुरवठा थांबू नये, अशा मागण्या रशियाकडे केल्या जाणार आहेत. भारतानं गेल्याच वर्षी एस-400 साठी आगाऊ रक्कम दिली आहे. चीनच्या ताफ्यात आधीपासूनच एस-400 यंत्रणा आहे

Tagged