पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

पैठण दि ७ : तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या थेरगाव येथील मुख्य रस्त्यावर लग्नकार्यासाठी पैठण येथे निघालेल्या अंबड तालुक्यातील गायकवाड या व्यक्तीला दोन चोरट्यांनी लूटमार करून हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. ही घटना ताजी असतानाच कौंदर गावात शनिवारी रात्री अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांनी गावातील काही घराच्या बाहेरून कडया लावत जवळपास तीन ते चार घरांमध्ये जबरी चोरी केली. यामध्ये छावा क्रांतिवीर सेनेच्या प्रदेश सरचिटणीस अनिल पाटील राऊत यांच्या घरी देखील चोरट्यांनी हात साफ केला आहे. या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस हद्दीत असलेल्या कौंदर गावामध्ये शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गावातील घरांच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावून जबरी चोऱ्या केली आहे. यामध्ये रावसाहेब ठाणगे यांच्या घरातील जवळपास सव्वा लाख रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने ऐवज चोरी करून अनिल राऊत यांच्या घरातील 30 हजार रुपयाचे नवीन साड्या, टी-शर्ट चोरून नेण्यात आले आहे. भगवान खिरे यांच्या देखील घरातून मोठ्या प्रमाणावर ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. त्यामुळे पाचोड पोलीसांच्या विरुद्ध नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच बीट जमादार किशोर शिंदे, फिरोज बर्डे, पोलीस पाटील गोपाल वैद्य यांनी घटनास्थळ जाऊन पंचनामा सुरू केला आहे.

Tagged