नाथसागराच्या आपत्कालीन दरवाजांसह 27 दरवाजे पुन्हा उघडले

न्यूज ऑफ द डे मराठवाडा

पैठण : तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे येथील नाथसागर धरण पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीत 80 हजार 176 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

आपत्कालीन दरवाजांसह 27 दरवाजे आज (दि.26) पुन्हा उघडले आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे, सहाय्यक अभियंता संदीप राठोड यांनी दिली. गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून पाणलोट क्षेत्रातील पाण्याची धरणामध्ये येणारी आवक सायंकाळपर्यंत वाढण्याची शक्यता नियंत्रण कक्षातून व्यक्त केल्या जात आहे.

Tagged