मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलकांनी घातला आ.प्रकाश सोळंकेंच्या घराला घेराव

न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव : मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी आंदोलनकांनी माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या केसापुरी कॅम्प येथील घराला घेराव घातला. याप्रसंगी आंदोलकांचे निवेदन स्विकारून मागण्यासंदर्भात आश्वासित करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लेखी पत्र दिले.

राज्यातील मुस्लिम समाज हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. समाजात शैक्षणिक प्रमाण अत्यल्प असल्याने मुस्लिम समाजाचा विकास होवु शकला नाही. मुस्लिम समाजाच्या आज पावेता केवळ राजकिय फायद्याच्या हेतुने मतदान मिळविण्यापुरता वापर करून सर्वांगिण विकासापासून शासन सोई सवलती पासुन मुस्लिम समाजास अलिप्त ठेवण्यात आले. मुस्लिम समाजाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास होण्यासाठी मुस्लिम समाजाला शैक्षणिक, शासकिय नोकरीच्या प्रवाहात आणण्यासाठी 10 टक्के मुस्लिम आरक्षण लागू करावे. ही मागणी मागील अनेक वर्षापासून आहे. त्या अनुषंगाने शनिवार दि.26 रोजी मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी माजलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांना त्यांच्या केसापुरी कॅम्प येथील घराला घेराव घातला. यावेळी आंदोलकांनी मुस्लिम आरक्षण लागू करण्यासाठी आपण सरकार दरबारी सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. त्यानुसार आ.सोळंकेनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून स्वतःही मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवले. या आंदोलनात मुस्लिम आरक्षण कृती समितीचे नुमान चाऊस, नगरसेवक शेख मंजूर, शकिल कुरेशी, मुफ्ती शब्बीर साहब, ईद्रीस पाशा, मुजम्मील पटेल, रियाज काझी, राजु कुरेशी, आरेफ खैरूल्ला खॉन, रौफ लाला, मोहसिन बागवान, शेख शौकत, शमशुद्दीन पठाण, अन्वर पटेल, शेख आसेफ, नुर आत्तार, मुजफ्फर शेख, सुलतान मन्सुरी, अल्ताफ मिर्झा आदीसह आंदोलक उपस्थित होते.

Tagged