corona

कोरोना रूग्णांमध्ये दिसतय हे नवं लक्षण

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबईः कोरोना या जागतिक महामारीने सर्वच जग हैराण आहे. हळूहळू कोरोनाची नवनवी लक्षणं समोर येत आहेत त्यामुळे अजुनच या आजाराविषयी अनिश्चितता वाढत आहे. आता कोरोना रूग्ण जे धडधाकट आहेत त्यांच्यामध्ये एक अजबच लक्षण दिसून येत आहे त्यामुळे जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या असणार्‍या मुंबईत डॉक्टर हैराण झाले आहेत.

मधुमेह नसलेल्या धडधाकट करोना रुग्णांच्या शरीरात अचानक शुगर लेव्हल अनियंत्रितपणे वाढत असून त्यामळे या संसर्गाने गुंतागुंत वाढली आहे. काही वेळा तर रुग्णांसाठी हे घातकही ठरत आहे. धडधाकट करोना रुग्णांमध्ये हा वेगळाच प्रकार आढळून येत असल्याने मुंबईतील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर हैराण झाले आहेत.

मधुमेह नसलेल्या धडधाकट करोना रुग्णांची शुगर लेव्हल अनियंत्रितपणे का वाढत आहे? याचा केईएमच्या डॉक्टरांचं एक पथक अभ्यास करत असून लवकरच त्याचं उत्तर मिळेल असं सांगितलं जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मधुमेह नसलेल्या अनेक रुग्णांनामध्ये साखरचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढलेलं दिसत आहे. हा प्रकार का वाढला आहे. आता यातुन आणखी काय पुढे येईल याची चिंता डॉक्टरांना आहे.

Tagged