जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची अखेर बदली, दीपा मुधोळ-मुंडे नव्या जिल्हाधिकारी

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची अखेर बदली करण्यात आली असून बीडला जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या दीपा मुधोळ या सिडकोच्या प्रशासक असून त्यांना बीड येथे पाठविण्यात आले असून शर्मा यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.

बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आता अखेर त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती बुधवारी करण्यात आली आहे. दीपा मुधोळ मुंडे या २०११ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे.

Tagged