acb trap

दोघे एसीबीच्या जाळ्यात!

बीड


दोन दिवसात चार लाचखोर पकडले
बीड
दि.30 ः जिल्ह्यात काल पोलीस कर्मचार्‍यासह खाजगी इसमास लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्यानंतर आज पुन्हा बीड एसीबीने कारवाई केली. पाटोदा तालुक्यातील तलाठ्यास गुरुवारी (दि.30) 20 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. तर लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍यासही अटक केली आहे. (beed acb trap news)

प्रवीण संदीपान शिंदे असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. ते पाटोदा तालुक्यातील सौताडा सज्जा येथे कार्यरत होते. तर दुसरा विशाल ठाकरे (वय 20 रा.सुप्पा, ता.पाटोदा) असे खाजगी इसमाचे नाव आहे. तक्रारदार यांचे मुलीचे नावे सौताडा शिवारात असलेली जमीन मा. दिवाणी न्यायालय, पाटोदा येथे दिवाणी प्रकरणामध्ये तडजोड झाल्यानंतर मा.दिवाणी न्यायालयाने तक्रारदार यांच्या सुनेचे नावावर सदर जमीन करण्यास आदेशित केले. आदेशाची अंमलबजावणी कामी सौताडा सज्जा तलाठी यांच्याकडे न्यायालयीन आदेश प्रतीसह अर्ज दाखल केला असता तलाठी प्रवीण शिंदे याने 20 हजार रुपयांची मागणी केली व मुद्रांक शुल्क न भरता काम करून देण्याची हमी दिली. लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले व यातील खाजगी इसम विशाल ठाकरे याने लाच रक्कम मागणीसाठी प्रोत्साहन दिले. कार्यारंभ ही लाच स्विकारताना तलाठी शिंदेला पंचसमक्ष पाटोदा तालुक्यातील वांजरा फाटा येथे रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदिप आटोळे, अपर अधीक्षक राजीव तळेकर, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, हनुमान गोरे, संतोष राठोड, गणेश मेहेत्रे यांनी केली.

Tagged