आयसीएमआरचा सर्वेचा रिपोर्ट आला!

महाराष्ट्र बीड

बीड, दि.14 : देशभरात कोरोना संसर्ग सुर झाल्यानंतर आयसीएमआरने सेरोसर्वे करीत देशातील विविध भागातून नागरिकांच्या रक्ताचे नमुने गोळा केले होते. बीड जिल्ह्यात आलेल्या आयसीएमआरच्या पथकाने 396 नमुने गोळा केले होते. त्यात 4 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याची धक्कादायम माहिती सर्वेच्या अहवालातून पुढे आलेली आहे.
आयसीएमआरचे जनरल डायरेक्टर बलराम भार्गवा यांचा सही असलेला अहवालाचा निष्कर्ष महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे सचिव प्रदीपकुमार व्यास यांना कळविला आहे. त्यात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातून 396 नमुने घेण्यात आले होते त्यात 4 पॉझिटीव्ह आढळून आले. परभणीत 396 पैकी 6 पॉझिटीव्ह, नांदेडमध्ये 393 पैकी 5 पॉझिटीव्ह, सांगलीमध्ये 400 पैकी 5 पॉझिटीव्ह, जळगावमध्ये 396 पैकी 2 पॉझिटीव्ह असल्याचे य अहवालात नमूद करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात सरासरी 1.01 नमुने पॉझिटीव्ह आल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.

कशासाठी होता हा सर्वे

देशभरात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्यानंतर आयसीएमआरने सर्वे करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यात त्यांना समुह संसर्ग झालाय किंवा नाही? कोरोना झालेले लोक आपोआप बरे होत आहेत का? कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी त्यांच्यात अ‍ॅन्टीबॉडी तयार झाल्या आहेत का? आदींची माहिती त्यातून मिळवून भारतात कोरोना किती लोकांना अपाय करू शकतो? कोरोनामुळे देशाचा मृत्यूदर कुठपर्यंत राहील? असे वेगवेगळे निष्कर्ष त्यातून आयसीएमआर काढले जाणार होते. तथापि त्यांनी आपला अहवाल महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला दिला आहे. आता यातून राज्यसरकार प्रशासनाच्या मदतीने काही धोरणात्मक निर्णय देखील घेऊ शकते.

जिह्यासाठी सकारात्मक बाब

अहवालातील निष्कर्षानुसार बीड जिल्ह्यात 1.01 लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. परंतु ते दवाखान्यापर्यंत न पोहोचता, किंवा त्यांच्यात कुठलेही लक्षणं नसताना ते सायलंट प्रसारक म्हणून जिल्ह्यात फिरलेले आहेत. असे असताना दवाखान्यापर्यंत येणार्‍याची संख्या कमी आहे. अर्थातच त्यांना त्रास झालेला नाही. त्यांचा कोरोना आपोआप बरा झालेला आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय सकारात्मक बाब आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार केला आणि त्यात 1.01 टक्के लोक इन्फेक्टेड होते या निष्कर्षानुसार बीड जिल्ह्यात किमान 30 हजार लोकांना कोरोना झालेला असू शकतो/होऊ शकतो असे म्हणावे लागेल. म्हणजेच जिल्ह्यातील लोकांमध्ये कोरोनाला हरविण्यासाठीच्या अ‍ॅन्टीबॉडी ऑलरेडी आहेत. त्यामुळेच कोरोना जिल्ह्याचं फार मोठं नुकसान करू शकलेला नाही, किंवा पुढेही करणार नाही.

…पण म्हणून कसेही वागून जमणार नाही

जिल्ह्यासाठी ही सकारात्मक बाब असली तरी अति फुशारकीत जाण्याची गरज नाही. मला काहीच होत नाही, या भ्रमात कुणी राहू नका. सायलेंट प्रसारक म्हणून फिरले आणि आगोदरच कुठल्यातरी आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले तर मात्र नुकसान होऊ शकते. त्यामुळे घरातील ज्येष्ठ आणि लहान मुलं यांची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे, असेही आरोग्य विभागाने कळविले आहे.

आयसीएमआर चा हाच तो रिपोर्ट

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged