भरधाव टेम्पो पलटी होऊन एकाचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

गेवराई दि.15 : भरधाव टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.15) रात्रीच्या सुमारास गढी उड्डाणपुलावर घडली.
गढी जवळील उड्डाणपुलावर (एमपी-04 जी-6521) हा भरधाव मालाने भरलेला टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged