३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे आदेश

बीड : जिल्ह्यात १० दिवसांचा लॉकडाऊन दि.२५ मे रोजी रात्री १२ पर्यंत लावण्यात आलेला होता. मात्र आता त्यात आणखी ६ दिवसांची वाढ करण्यात आली असून दि.३१ मे रात्री १२ पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज (दि. २४) आदेश काढले आहेत. केवळ भाजीपाला फळे विक्रीसाठी सकाळी ७ ते ९ सवलत देण्यात आली आहे. अन्य आस्थापना सुरू राहणार नाहीत असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. कोविड -१९ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता दिनांक २५ मे २०२१ रोजीचे रात्रीचे १२ वाजेपासून ते ३१ मे २०२१ रोजीचे रात्रीचे १२ वाजेपर्यंत खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

जिल्हाधिकारी यांचे आदेश

1
2
Tagged