आनंदाची बातमी! राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

बीड दि.3 : ज्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के आहे. आणि ऑक्सिजनची उपलब्धतता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरु होतील अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पाहिल्या टप्प्यात राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवण्यात आले आहे. सर्वांसाठी ही दिलासादायक बातमी असून लवकरच बीड जिल्ह्याचेही लॉकडाऊन शिथील होणार आहे.

राज्यात कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आहेत. यामध्ये ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले. तर दुसर्‍या टप्प्यातील 6 जिल्हे आहेत. यामध्ये अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार तर तिसर्‍या टप्प्यातील 10 जिल्हे आहेत. यामध्ये अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर व चौथ्या टप्प्यात पुणे व रायगड ही जिल्हे आहेत. त्यामुळे आता हळूहळू शिथीलता मिळत आहे.

पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यात काय सुरु राहणार
रेस्टॉरंट, मॉल्स गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील तसेच खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील. चित्रपट शुटींगला परवानगी, थिएटर सुरू होतील. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल. जिम, सलून सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. बस 100 टक्के क्षमतेने आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल. इतर राज्यातून येणार्‍यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील.

Tagged