लाचखोरी अंगलट; निरीक्षक विश्वास पाटील नियंत्रण कक्षात!

बीड


पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा दणका
केशव कदम । बीड
दोन दिवसापूर्वी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यासह खाजगी इसमावर लाच स्विकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तडकाफडकी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.

विश्वास पाटील यांच्याकडे काही महिन्यापूर्वीच बीड ग्रामीण पोेलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला होता. 29 नोव्हेंबर रोजी रिक्षा चालकाकडून 300 रुपये हप्त्याप्रमाणे दोन महिन्याचे 600 रुपये स्विकारताना कर्मचार्‍यासह खाजगी इसमास बीड एसीबीने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कर्मचारी अनिल घटमळ यांचे निलंबन केले होते. कार्यारंभ त्यानंतर आज ठाणेप्रमुख पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे. बीड ग्रामीण ठाण्याचा पदभार सहायक निरीक्षक वैभव रणखांब यांच्याकडे तात्पुरता देण्यात आला आहे.

Tagged