acb trap

गायगोठा फाईलसाठी लाच घेणारा शिक्षक एसीबीने रंगेहाथ पकडला!

बीड

केशव कदम
गेवराई : गायगोठा फाईलचा वर्ककोड काढून सिक्युर भरण्यासाठी लाभार्थ्यास दोन हजार रुपयांची मागणी केली. ही दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना सध्या प्रतिनियुक्तीवर गेवराई पंचायत समितीत अभिलेख व्यवस्थापनावर असलेल्या शिक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई बीड एसीबीने बुधवारी (दि.13) दुपारी गेवराई पंचायत समितीच्या आवारात केली.

अमोल रामराव आतकरे (वय -38 रा.रंगार चौक गेवराई, शिक्षक जिल्हा परिषद शाळा टेम्बी तांडा गेवराई) असे लाच स्विकारणार्‍याचे नाव आहे. आतकरे हे सध्या प्रतिनियुक्तीवर गेवराई पंचायत समितीत अभिलेख व्यवस्थापनासाठी संलग्न आहेत. त्यांनी तक्रारदार यांचे नावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती गेवराई येथून गायगोठा मंजूर करण्यासाठी फाइल दाखल केली. त्यांचे वर्ककोड काढून, सिक्युर कोड काढून अर्ज ऑनलाईन फिडींगचे काम करण्यासाठी तक्रारदारास दोन हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्किारताना गेवराई येथे रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कार्यारंभ ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदिप आटोळे, अपर अधीक्षक राजीव तळेकर, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक युनुस शेख, अमलदार अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, अंबादास पुरी, भरत गारदे यांनी केली.

Tagged