collector beed

दीपा मुधोळ- मुंडे बीडच्या नविन जिल्हाधिकारी

बीड


बीड दि. 14 : मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी शर्मा यांची बदली होणार असल्याची चर्चा होती, परीक्षेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या नियुक्तीच्या चर्चा होत्या परंतु दीपा मुधोळ मुंडे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दीपा मुधोळ मुंडे या २०११ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आता अखेर त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती बुधवारी (दि.14)करण्यात आली आहे.

Tagged