corona

बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड- जिल्ह्यात कोरोना covid 19 रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. मागील पंधरा दिवस जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 50 च्या आत आलेला होता. शनिवार दि.20 फेब्रुवारी रोजी हा आकडा 58 वर जाऊन पोहोचला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी आजचा अहवाल प्रसिध्दीस दिला आहे.

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकार आणि प्रशासन दोघेही चिंतेत आहे. आता तर राज्यातील काही जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय देखील झालेला आहे. बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन पडतंय की काय अशी विचारणा सातत्याने एकमेकांना केली जातेय. मात्र प्रशासन स्तरावरून अद्याप अशा कुठल्याही हालचाली नाहीत. मात्र कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी, म्हणत प्रशासनाने दोन दिवसात विविध मंगल कार्यालये आणि कोचिंग क्लासेसला भेटी देऊन सुचना केल्या आहेत.

मागील आठवडा भरात आढळलेले कोरोना रुग्ण खालील प्रमाणे
12 फेब्रुवारी – 16 रुग्ण
13 फेब्रुवारी – 28 रुग्ण
14 फेब्रुवारी – 26 रुग्ण
15 फेब्रुवारी – 16 रुग्ण
16 फेब्रुवारी – 19 रुग्ण
17 फेब्रुवारी – 28 रुग्ण
18 फेब्रुवारी – 37 रुग्ण
19 फेब्रुवारी – 30 रुग्ण
20 फेब्रुवारी – 58 रुग्ण
पहा कोणत्या तालुक्यात आढळले किती रुग्ण?

1
2
Tagged