पंतप्रधान सहाय्यता निधीतून बीड जिल्ह्यास 38 व्हेंटिलेटर्स

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून pm care fund बीड जिल्ह्याला 38 व्हेंटिलेटर्स ventileters देण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या खा.प्रीतम मुंडे यांनी याबाबतची माहिती देत पंतप्रधानांचे prime minister आभार मानले.

जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्‍यांनी येथील शासकीय रुग्णालयास भेट देऊन व्हेंटिलेटर्स व्यवस्थित पोहोचले याची खात्री करून घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भगिरथ बियाणी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाच्या संकटात बीड जिल्ह्याच्या 38 व्हेंटिलेटर्स मिळाल्यामुळे आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळाली आहे. या मदतीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे बीड जिल्ह्याच्यावतीने जिल्ह्याच्या खा.प्रीतम मुंडे यांनी आभार मानले आहेत.
Read E-PAPER karyarambh

Tagged