Site icon कार्यारंभ लाईव्ह

माजलगाव, मैंदा येथे 36 लाख रुपयांचा गुटखा पकडला

DHIRAJKUMAR BACHCHU

DHURAJKUMAR BACHCHU KARWAI GUTAKHA

सहायक पोलीस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांची कारवाई

प्रतिनिधी । बीड
दि.21 : माजलगाव विभागीय पोलिस अधिकारी डॉ. धीरजकुमार बच्चू DHIRAJKUMAR BACHCHU यांच्या पथकाने रात्रीतून 36,21,237 रुपयांचा गुटखा पकडला आहे. माजलगाव शहरात गुटख्याचा साठा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या प्रकरणी सुनील आश्रूबा कदम रा.जिजामाता नगर,माजलगाव, श्रीधर रवींद्र ठोंबरे रा.बीड, बाळू घुबरे रा. मैंदाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव विभागीय पोलिस अधिकारी डॉ.धीरकुमार बच्चू यांना गोपनीय माहिती मिळाली की जिजामाता नगर येथे सुनील आश्रुबा कदम यांच्या राहत्या घरी गुटखा विक्रीसाठी मालाची साठवणूक केलेली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह शुक्रवार दि.20 रोजी रात्री 11 वाजता सुनील आश्रुबा कदम यांच्या राहत्या घराची तपासणी केली असता त्यात तब्बल 2 लाख 13 हजार 667 रुपयांचा गुटखा मिळून आला. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपी सुनील कदम (रा.जिजामाता नगर,माजलगाव) याची चौकशी केली असता सदर माल कोठून आणला असे विचारले असता त्याने मैंदा येथून बाळू घुमरे यांच्या आखाड्यावरून श्रीधर रवींद्र ठोंबरे यांच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. रात्रीतून तपास वेगाने फिरवत वरील नमूद ठिकाणी दि.21 रोजी रात्री 2 वाजता बाळू घुमरे यांच्या आखड्याची झडती घेतली असता 34 लाख 7 हजार 600 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. माजलगावचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर शंकरराव कांबळे यांनी दिलेल्या तक्रारी वरून आरोपी सुनील आश्रूबा कदम रा.जिजामाता नगर,माजलगाव, श्रीधर रवींद्र ठोंबरे रा. बीड, बाळू घुबरे रा. मैंदा यांच्या 328, 188, 272, 273, 34 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
———-

Exit mobile version