Site icon कार्यारंभ लाईव्ह

रिक्षाचा 600 रुपये हप्ताघेणारे दोघे एसीबीच्या जाळ्यात!

acb trap


बीड दि.29 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढतच आहे. बीड ग्रामीण ठाण्यातील पोलीस अमलदारासाठी रिक्षाचा 600 रुपये हप्ता म्हणून लाच मागणारा खाजगी इसम बुधवारी (दि.29) एसीबीच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी पोलिसांनी कर्मचाऱ्यासही ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने बीड जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

कैवाडे असे खाजगी इसमाचे नाव आहे. त्याने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी अनिल घटमळ या पोलीस कर्मचाऱ्यासाठी रिक्षा चालकास 300 रुपये प्रतिमहा दोन महिन्यांचे 600 रुपये अशी लाचेची मागणी केली. तक्रारदाराने बीड लाचलुचपत प्रतबंधक विभगाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. कार्यारंभ बीड लचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version