Site icon कार्यारंभ लाईव्ह

सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूनंतर त्याच्या वहिनीचा मृत्यू

बिहारः सुशांत सिंग राजपुत याच्या मृत्यूनंतर बॉलीवूड तसेच प्रेक्षकवर्ग देखील हळहळत आहे. त्याच्या आत्महत्येने अनेक गोष्टींचा वेगळ्या दृष्टीने विचार करायला भाग पाडले आहे. त्याच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आता आणखी एक दुःख त्याच्या कुटूंबासमोर येऊन ठेपले आहे.

सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकुन त्याच्या वहिनीने प्राण सोडल्याची घटना घडली आहे. त्यांनी सुशांतच्या जाण्याची वार्ता ऐकताच अन्नत्याग केला आणि त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आता पुढे येत आहे. सुधादेवी असे त्यांचे नाव असुन त्या बिहारच्या पुर्नीया जिल्हयात राहत होत्या.

सुशांतचे असे जाणे त्यांना सहन न झाल्याने त्या शॉकमध्ये होत्या. काल सुशांतवर मुंबई येथे अंत्यसंस्कार होत असताना, सुधादेवी यांचा बिहारमध्ये मृत्यू झाला. या घटनेने सगळीकडेच हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version