Site icon कार्यारंभ लाईव्ह

जिजाऊ मल्टीस्टेटचा मुख्य आरोपी बबन शिंदे अटक!

बीड दि.24 ः जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सो.लि.बीडचा मुख्य प्रवृत्तक व मुख्य आरोपी बबन शिंदे यास मथुरा वृंदावन राज्य उत्तरप्रदेश येथून अटक करण्यात आली आहे. बीड जिल्हा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सो.लि.बीडच्या बीड व धाराशिव येथे ठेवीदारांची फसवणूकीचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 159 कोटी रूपयाचा अपहार झालेबाबत तपासात निष्पन्न झालेले आहे तसेच सदर मल्टीस्टेटच्या एकूण 04 शाखा आहेत. त्या बीड, धाराशिव येथे आहेत तसेच सदर गुन्हयातील ठेवीदार यांचे ठेवीबाबत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सो.लि.बीड चा मुख्य प्रवृत्तक बबन विश्वनाथ शिंदे हा त्याचे विरुध्द गुन्हा दाखल होण्याचे पुर्वी दिनांक 3 जुलै 2023 पासून बीड जिल्हयातुन फरार झाला होता. तो वारंवार त्याची वेशभुषा बदलून व सीमकार्ड बदलुन दिल्ली, नेपाळ, आसाम, ओरीसा, उत्तरप्रदेश व विविध ठिकाणी लपून राहत होता. त्याचा आर्थिक गुन्हे शाखेतील व स्थानीक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कसून शोध घेत होते. नमूद आरोपी हे वेळोवेळी त्यांचे वेगवेगळे ठिकाण बदलून व विविध ठिकाणी त्यांचे मोबाईल सीमकाडे बदलून राहत होते. वरीष्ठांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन तो कृष्णामंदीर वृंदावन येथे वेश बदलुन व संत महंताच्या वेशात राहत असल्याचे गुप्त बातमीवरुन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी योग्य त्या सुचना देवून स्थानीक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक एस.एस.मुरकुटे व पोलीस अंमलदार तुळजीराम जगताप, संजय पवार, यांना पाठवून त्यांनी अतिशय गुप्तता बाळगुन मोठ्या शिताफिने दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी कृष्ण मंदीर वृंदावन येथे एका खोलीमध्ये छापा मारुन त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाणे शिवाजी नगर बीड गुरनं 360/2023 कलम 420,406,409,34 भादंवि सह कलम 3,4 एमपिआयडी गुन्हयात अटक करण्यात आले आहे. सदरची कामगिरी विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस. मुरकुटे व पोलीस अंमलदार तुळजीराम जगताप, संजय पवार, यांनी केलेली आहे. त्यामध्ये पोलीस अंमलदार संजय पवार बीड यांचे विशेष योगदान आहे.

Exit mobile version